Abhi Gholap

Founder FilmClub

"देऊळ" या माझ्या पहिल्या चित्रपटाला सुवर्णकमळ नॅशनल अवॉर्ड नि सन्मानित केल्यानंतर काही चित्रपट मी भारतात केले. त्याच वेळेला मनात एक कल्पना घोळत होती कि मराठी चित्रपट सृष्टी नॉर्थ अमेरिकेत स्थापन करावी. अल्पावधीतच ५०० हुन अधिक मेंबर्स मिळाले. वर्षाअखेरीस २ शॉर्ट फिल्म्स ची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून फिल्म क्लब च्या तयारीला लागलो. अनेक गुणी कलावंत, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफेर्स, संकलक यांनी फिल्म क्लब मध्ये नोंदणी केली. बरेच मेंबर्स नाटक आणि स्टेज परफॉर्मन्सस करत होते. त्यांच्या साठी नॅशनल अवॉर्ड विंनिंग दिग्दर्शक, उमेश विनायक कुलकर्णी यांचा फिल्म मेकिंग कार्यशाळा आयोजित केली. त्याच बरोबरीने अनुभवी व नावाजलेल्या फिल्म मेकर्स बरोबर संवाद स्थापण्यासाठी " टॉक शो " series ची सुरवात केली. यात, Dr. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उमेश कुलकर्णी, Dr. सलील कुलकर्णी यांचे सेमिनार्स झाले.

२ शॉर्ट फिल्म्स च्या निर्मिती चे ध्येय सर्व मेंबर्स समोर मांडले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची पहिली गरज उत्तम कथा. ६५ हुन अधिक कथा आमच्या मेम्बर्सनी आम्हाला पाठवल्या. नॉर्थ अमेरिकेशी संदर्भ प्रस्थापित करण्याऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. त्यातून ५ कथा निवडण्यासाठी १४ मेंबर्स चे एक पॅनल स्थापले. त्याच बरोबर को-प्रोड्युसर चा शोध सुरु केला. आपलच्याच मेंबर्स मधून १७ को-प्रोड्युसर्स पुढे आले. लवकरच २ कथा ठरवण्यात येतील आणि चित्रपट निर्मिती च्या प्रक्रियेला सुरवात होईल.

२७-२८ जुलै २०२४ रोजी नॉर्थ अमेरिकेतील पहिला मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. या दिवशी आपल्या सर्वांना नवीन चित्रपट त्यांच्या कलाकार अँड फिल्म मेकर्स बरोबर बघता येतील. आपल्यातल्या कुणाला NAFA फिल्म क्लब जॉईन करायचा असेल तर कृपया खालील लिंक चा वापर करावा. (www.nafaglobal.org) जास्तीत जास्त मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, टीव्ही सिरिअल्स यांचे निर्मिती करणारी भूमी म्हणून आपण सर्व प्रयत्न करूयात. तुमची मोलाची साथ अपेक्षित धरतो. फिल्म क्लब ला उत्तम आधार देण्याऱ्या माझ्या सर्व टीम चे आभार.

धन्यवाद !

अभिजीत घोलप